रत्नागिरी जिल्हास्तरीय शिक्षण विभाग आयोजित 53 व्या विज्ञान प्रदर्शनात आदर्श शाळा सडे जांभारी न. २ शाळेने विद्यार्थी प्रतिकृती मध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. शिक्षण विभाग आयोजित 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी प्रतीकृतीमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सडे जांभारी न. २नंबर शाळेने शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी सौर चाळणी या विषयावर अंतर्भूत मॉडेल तयार केले होते. यामध्ये परीक्षानानंतर या प्रतिकृती ला तृतीय क्रमांक पटकावून राज्यस्तरावर निवड करण्यात आली .प्रशालेचे विद्यार्थी निकुंज संजय दावडे, वैष्णवी विजय वेलुंडे, ऋषिकेश दिलीप डिंगणकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष रामचंद्र मुंडेकर, श्री उदय सखाराम गोरीवले, श्रीमती पल्लवी पांडुरंग डिंगणकर, श्री विशाल चंद्रकांत पवार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक प्राप्त आदर्श शाळा सडे जांभारी नं.२ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













