जानवळे उपसरपंच वैभवी जानवळकर यांच्याहस्ते नगरसेविका कोमल जांगळींचा सत्कार

गुहागर प्रतिनिधी
गुहागर नगरपंचायत निवडणूकित मनसेकडून निवडून आलेल्या एकमेव उमेदवार कोमल दर्शन जांगळी यांचा मनसेच्या जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी नुकताच सत्कार केला.
गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत मनसेने आपले खाते उघडले.या निवडणुकीत मनसेने प्रथमच आपला उमेदवार निवडून आणला. साहजिकच मनसेसाठी हा विजय ऐतिहासिक आणि एका नव्या पर्वाची सुरुवात करणारा ठरला आहे.मनसेपक्षासाठी आजपर्यंत अहोरात्र मेहनत घेणारे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी आपल्या पत्नी व कार्यकर्त्यांसोबत नगरसेविका कोमल जांगळींचा सत्कार केला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री विनोद गणेश जानवळकर शुंगातळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर पत्रकार गणेश किर्वे उप शहराध्यक्ष विक्रांत सांगळे, विभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार, महाराष्ट्र सैनिक विवेक जानवळकर ,दर्शन जांगळी, प्रशांत जांभळी आदी मान्यवर उपस्थित होते.