मुणगे हायस्कुलचे 30 डिसेंबरला स्नेहसंमेलन!

मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा ३० डिसेंबर रोजी होणार आहे.सकाळी 9 वाजता श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस समारंभ होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी सेवाभारती कोकण प्रांत ट्रस्ट सिंधुदुर्गचे भगीरथ राणे तसेच शेठ म. ग. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक संजीव राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी नऊला विद्यार्थ्यांनी केलेल्या रांगोळी, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन, 10 वाजता पारितोषिक वितरण, 11.30 वा अल्पोपहार, सायंकाळी 5.30 पासून विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.