चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील पोफळी-शिरगाव परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवलेला विदेशी व देशी दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दीपक शिवाजी चव्हाण (वय ३१, रा. शिरगाव बाजारपेठ) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री २०:५० वाजताच्या सुमारास शिरगावच्या सीमेवर असलेल्या वाशिष्टी नदीच्या किनारी, एका शेवरीच्या झाडाखाली घडली. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मारोती तुकाराम वागदकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी हा कोणताही परवाना नसताना चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगून होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण ६,३९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील ब्रँड्सच्या १८० मिलीच्या बाटल्यांचा समावेश आहे: रॉयल स्टॅग (०५ बाटल्या)
रॉयल चॅलेंज (०५ बाटल्या)मॅकडॉवेल नं. १ व्हिस्की (०५ बाटल्या)डी.एस.पी. ब्लॅक डिलक्स व्हिस्की (०५ बाटल्या) मॅकडॉवेल नं. १ रम (०५ बाटल्या) टँगो पंच देशी दारू (०९ बाटल्या)या घटनेची अधिकृत नोंद २९ डिसेंबर रात्री २३:१० वाजता करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.











