तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी
वैभववाडी | प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत करूळ येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 24 जणांनी रक्तदान केले. ग्रामपंचायत करूळ, के. सी. महाविद्यालय मुंबई व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करुळ येथे रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन सरपंच नरेंद्र कोलते यांच्या हस्ते पार पडले. यावेळी के.सी. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सतीश कोलते, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पडवळ, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, प्रशांत ढवण, विलास कोलते, सिद्धेश कोलते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंदे मातरम सामाजिक संस्था संचलित जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांनी या शिबीराला उपस्थिती दर्शविली. के सी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी रक्तदान करून सहकार्य केले. यावेळी सर्व रक्तदात्यांचे सरपंच नरेंद्र कोलते यांनी आभार मानले.













