कार्यकारिणी निवड बिनविरोध
चौके – प्रतिनिधी :-मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ समादेवी चौक येथील आदर्श रिक्षा चालक मालक असोसिएशन कट्टाच्या नूतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली. यामध्ये सुहास विठ्ठल भोजने यांची सलग चौथ्यादा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
याबाबत मा. धर्मदाय आयुक्त विभाग सिंधुदुर्ग यांनी न्यायालयीन चौकशी अर्ज क्रमांक 477/2025 च्या आदेशान्वये सदर निवडीचा ठराव मांडण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व सभासद यांच्या एकमताने रिक्षा चालक मालक असोसिएशनची संपूर्ण कार्यकारीणी बिनविरोध करण्यात आली.
. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – गिरीश चव्हाण सेक्रेटरी, सखाराम चव्हाण खजिनदार, तर सदस्यपदी संदीप फोपळे, देवेंद्र बांदेकर, सचिन गावडे, अंकुश पारकर, धोंडी लुडबे, बापू वायंगणकर, विनोद केसरकर, अरुण घोगळे, सचिन शिरोडकर, रामचंद्र चव्हाण, संजय चव्हाण, राजेश भोगटे, उपेंद्र बोडये, मिलिंद वाईरकर यांची सर्वानुमते एकविचाराने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गणेश वाईरकर, प्रशांत वाईरकर, बंडू तांबट, बाबल करलकर, सचिन ढोलम, वंदेश ढोलम, राजू गावडे, बाळा बिलये उपस्थित होते. या सर्वांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. या सर्व गोष्टीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांचे सहकार्य मिळाल्याने आज अनेक रिक्षा चालक मालक आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे सर्व रिक्षा चालक मालक यांनी त्यांचे यावेळी आभार मानले.










