शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न : राणे कुटुंब हेच माझे सर्वस्व : दत्ता सामंत
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्गातील जनतेचे प्रेम आशीर्वाद तसेच कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठिंब्यावर आमदार ते मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री हा प्रवास करू शकलो. याप्रवासात अनेक जिवाभावाची माणसे भेटली. या दरम्यान अनेक कार्यकर्ते घडवता आले. माझ्या जीवनात कार्यकर्ते हेच सर्वोच्च स्थानी आहेत. दत्ता सामंत हा त्यापैकी एक. साधेसरळ असे हे व्यक्तिमत्व दातृत्व गुणासह सतत जनतेची सेवा करत आहे. दत्ता सामंत यांना दीर्घायुष्य लाभो. अश्या सदिच्छा माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केल्या.
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच त्यांची मुलगी सान्वी यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठया उत्साहात मालवण कुंभारमाठ येथे साजरा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली. पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने सहकारी मित्र परिवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा आनंददाई ठरला.
यावेळी सौ. निलमताई राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, सौ. दिव्या सामंत, सान्वी सामंत, संजय पडते, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, जिल्हा चिटणीस दादा साईल, उद्योजक दिपक परब, बाबू बिरमोळे, नगराध्यक्षा ममता वराडकर, सुरेश सावंत, उमेश नेरुरकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, संदीप कुरतडकर, बाळू कुबल, गजू बाकरे, शाम वाक्कर, उपजिल्हाप्रमुख महेश राणे, अरविंद करलकर, विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख नगरसेवक दिपक पाटकर, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, कुडाळ शहर प्रमुख नगरसेवक अभि गावडे, आबा धडाम, तालुकाप्रमुख दीपक नारकर, संतोष साटविलकर, सुशांत घाडीगांवकर, मकरंद राणे, मधुकर चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, राजू बिडये, पंढरीनाथ माने, महेश जावकर, संतोष कोदे, किसन मांजरेकर, अखिलेश शिंदे, उमेश बिरमोळे, राजा सामंत, सूर्यकांत फणसेकर, प्रसाद मोरजकर, पिंट्या गांवकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक, नगरसेविका तसेच मोठया संख्येने पदाधिकारी उपास्थित होते.
यावेळी खासदार राणे साहेब म्हणाले, 1990 च्या माझ्या पहिल्या आमदारकीच्या विजयात सर्वांचे प्रेम लाभले. हेच प्रेम कायम राहिल्यामुळे आमदार ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री हा प्रवास करू शकलो. याप्रवासात अनेक माणसे भेटली. कार्यकर्ते घडवले. माझ्या जीवनात कार्यकर्ते हेच सर्वोच्च स्थानी आहेत. दत्ता सामंत हा त्यापैकी एक साधेसरळ व्यक्तिमत्व.
दत्ता तुझ्या नशिबात यश आहे. आमदार निलेश राणे यांचे दत्ता सामंत यांच्यावर विशेष प्रेम आहे. येथील जनताही भाग्यवान आहे. त्यांना निलेश राणे यांच्या सारखे आमदार व दत्ता सामंत यांच्या सारखे जिल्हाप्रमुख लाभले. मी समाधानी आहे. या जनतेने प्रेम दिले. तेच प्रेम आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर करतात. त्यांचे विधिमंडळातील काम आदर्शवत आणि अभिमानास्पद आहे. असे राणे साहेब म्हणाले.
*राणे कुटुंब हेच माझे सर्वस्व : दत्ता सामंत*
राणे साहेब हेच माझे गुरु आणि सर्वस्व आहेत. मी कायम राणे साहेबांचाच कार्यकर्ता राहणार. राणे साहेब अनेकांचे गुरु आहेत ते चालते बोलते विद्यापीठ आहेत. त्यांच्याकडून नेहमीच नवीन शिकायला मिळते. राणे साहेब तुमच्या प्रमाणे नेतृत्व आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आहे. 2029 ला निलेश राणे यांचा सर्वात मोठा विजय हेच आमचे लक्ष आहे. आमदार निलेश राणे म्हणजे विकासाचा महामेरू आहेत. एका वर्षात मालवण कुडाळ मध्ये शेकडो कोटी विकासनिधी आमदार निलेश राणे यांनी खेचून आणला. मी जिखाप्रमुख म्हणून जनतेला दिलेला प्रत्येक शब्द आमदार पुर्ण करतात. त्याच प्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्ह्यात काम सुरु आहे. आमचा ब्रँड राणे कुटुंब हाच आहे. असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी संदीप कुरतडकर, बाळू कुबल व अन्य मान्यवरांनी विचार मांडले. शुभेच्छा दिल्या.
फोटो : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सौं. निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्ता सामंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. (गणेश गावकर, अमित खोत, मालवण)
फोटो : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सौं. निलमताई राणे यांनी दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (गणेश गावकर, अमित खोत, मालवण )











