मंडणगड प्रतिनिधी:-
मंडणगड तालुका विकास संस्था सचिव संघटनेच्या कार्याध्यक्षपदी मंगेश पवार, तर सहसचिवपदी सागर भोगल यांची नियुक्ती झाला आहे. 9 जानेवारी 2026 रोजी संघटनेचे अध्यक्ष विजय ऐनेकर यांच्या अध्यक्षतेखील कुणबी भवन मंडणगड येथे संपन्न झालेल्या सभेत सर्वानुमते या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले सभेला उपाध्यक्ष नानु खैरे, सचिव अनंत पारधी, प्रताप बर्जे, किरण तांबे, नाना करजांवकर, गणपत शिगवण, विष्णू सुगदरे, नरेश पातेरे, प्रथमेश जोगी, श्रीमती दिक्षा मोरे, अप्रिता भोसले, उपस्थित होते. निवडीबद्दल मंगेश पवार, व सागर भोगल यांचे तालुक्यातून कौतूक होत आहे.











