मसुरे | झुंजार पेडणेकर
त्रिंबक साटमवाडी येथे स्मशानशेडचे भूमिपूजन सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 25/15 योजनेतून निधी मंजूर झाला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला.
यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच सुचिता घाडीगावकर,ग्रामपंचाय त अधिकारी सौ माधुरी कामतेकर, सदस्य नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सागर चव्हाण, माजी उपसरपंच आशिष बागवे, सदस्य सपना तेली, पोलीस पाटील गणेश गोसावी, सिताराम सकपाळ, माजी सरपंच चंद्रशेखर सुतार, ज्ञानदेव साटम, सत्यवान परब, धोंडी गावडे, अशोक भोगले, कृष्णा साटम, वासुदेव आंगणे, विलास मुळेये, कमलेश साटम, मोहन साटम, नागेश साटम, स्मिता साटम, स्वप्नजा साटम, छाया साटम, अजिंक्य साटम यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.











