वेंगुर्ला भाजप तर्फे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

वेंगुर्ले l प्रतिनिधी :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ साहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आज सोमवारी वेंगुर्ला महिला मोर्चा मार्फत प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. वृंदा गवंडळकर, शहर अध्यक्ष सौ. श्रेया मयेकर, भाजप तालुका सरचिटणीस श्री. वसंत तांडेल, नवनिर्वाचित नगरसेवक सौ. शीतल आंगचेकर , सौ. आकांक्षा परब, सौ. काजल कुबल, सौ. गौरी मराठे, सौ. गौरी माईणकर , सौ. रिया केरकर, युवा मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रणव वायंगणकर तसेच सौ. हसीनबेगम मकानदार आदी उपस्थित होते.