भगवती हाय मुणगे येथे विद्यार्थी वार्षिक गुणगौरव उत्साहात संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर
या प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. यापुढेही विध्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक गरजा संस्थेकडून पूर्ण केल्या जातील.भविष्यात विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त करून प्रशाला, संस्था आणि गावाचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांनी येथे केले. श्री भगवती हाय. मुणगे येथे विद्यार्थी वार्षिक गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर मुणगे सरपंच अंजली सावंत,पं.स. माजी सभापती सुनिल पारकर, देवगड हाय. माजी मुख्याध्यापक संजीव राऊत, भगवती एज्यु सोसायटी सेक्रेटरी विजय बोरकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निलेश परुळेकर भगवती एज्यु. सोसा. उपाध्यक्ष विलास मुणगेकर,पोयरे माजी सरपंच संदिप घाडी, मुख्याध्यापक मोनिका कुंज, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प प्रमुख हेमंत आईर, रा.स्व. नारिंग्रे मंडळ प्रमुख सुनील बापट, मोर्वे पोलिस पाटील मुकेश धुरत, भगवती एज्यु समिती व्यवस्थापक देवदत्त पुजारे, सदस्य संजय बांबुळकर, धर्माजी आडकर, नंदकुमार बागवे, विजय पडवळ, आदि मान्यवर उपस्थित होते.

मुल्यवर्धित शिक्षण घेणे हे वि‌द्यार्थ्याचे आद्यकर्तव्य असून आईवडिलांच्या कष्टाचे ऋण फेडूनच विद‌यार्थी जीवनात यशस्वी होवू शकतो असे प्रतिपादन सेवाभारती कोकणप्रांतचे भगिरथ राणे यांनी केले. यावेळी इयत्तेनुसार गुणानुक्रमांक प्राप्त वि‌द्यार्थी, स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी तसेच चित्रकला व क्रिडाक्षेत्रात यशप्राप्त वि‌द्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना संजीव राऊत, विजय बोरकर, सुनिल पारकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या हस्तकलेतून आणि लेखनातून साकारलेल्या “ज्ञानवेल” हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रशालेला २०० खुर्च्या देणगीदाखल दिल्याबद्दल श्री भगवती एज्यु. सोसायटी सेक्रेटरी विजय बोरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड व रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीकसाईड यांच्यामार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी किटचे यावेळी वाटप करण्यात आले. तसेच शेठ मफतलाल गगलभाई हाय, देवगडचे माजी मुख्या. संजीव राऊत यांचे मार्फत हायस्कूलमधील प्रत्येक वर्गातून एक आदर्श विद्यार्थ्याची निवड करून त्यांना प्रशस्तिपत्रक व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका गौरी तवटे, प्रास्ताविक मुख्याध्यापक मोनिका कुंज आणि सहा-शिक्षक प्रसाद‌ बागवे यांनी केले. आभार सहा. शिक्षिका रश्मी कुमठेकर यांनी मानले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.