प्रतिनिधी/ रोहन कांबळे
अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं आहे.
कोल्हापूर महापालिकेवर शुक्रवारी महायुतीचा झेंडा फडकला आहे. अटीतटीच्या झालेल्या लढतीत, काँग्रेसने काँटे की टक्कर देत महापालिकेत सर्वाधिक ३७ जागा पटकावल्या. गतवेळच्या तुलनेत यंदा भाजपाने जोरदार मुसंडी मारत २७ जागांवर विजय मिळवला. शिवेसेनेही दमदार कामगिरीच्या जोरावर १५ जाग घेतल्या. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र, जोरदार फटका बसला असून त्यांच्या चारच जागांवर विजय मिळवता आला. सत्तेसाठी ४१ जागांची असणारी मॅजीक फिगर गाठत महायुतीने काँग्रेसचे सत्तेच्या हट्ट्रीकचे स्वप्न धुळीस मिळवले. महापालिका स्थापनेनंतर भाजप प्रथमच सत्तेत आला आहे.
कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली. महायुतीच्या प्रचारामध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरूनही सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी मिळवलेलं यश लक्षणीय आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि ही अशी एकमेव महापालिका होती ज्या ठिकाणी महायुती झाली होती. काँग्रेसने ८१ पैकी ७५ जागांवर उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे 37 उमेदवार विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला.
दुसरीकडे महायुतीमध्ये पण भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपला २४ जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाला १४ जागा मिळाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिडोर्ले जे काँग्रेसकडून पुरस्कृत होते ते सुद्धा पराभूत झाले. कोल्हापूरची लढत उत्तरोत्तर सतेज पाटील विरुद्ध महायुती अशीच झाली होती. पाटील यांना रोखण्यासाठी महायुतीकडून मोठा डाव टाकण्यात आला. सतेज पाटील यांनी रस्त्यावर उतरून प्रचाराची धुरा सांभाळली होती. ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ त्या पद्धतीने कॅम्पेन राबवण्यास सुरुवात केली होती. यानंतर पाटील यांच्या कॅम्पेनमागून महायुती जाताना दिसून आली. पाटील रस्त्यावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरात प्रचाराला यावं लागलं. भाजप प्रदेशाध्यक्ष सुद्धा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आले होते.
दुसरीकडे, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक हायव्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना शिंदे गटाच्या शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला. त्यामुळे एक प्रकारे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना हा झटका आहे. शारंगधर देशमुखयांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. कोणत्याही परिस्थितीत देशमुख यांचा पराभव करण्यासाठी सतेज पाटील यांच्याकडून कंबर कसण्यात आली होती. मात्र, तुल्यबळ लढतीत राहुल माने यांचा शारंगधर देशमुख यांनी पराभव केला. त्यामुळे हा त्यांचा मोठा विजय मानला जात आहे. दरम्यान, फक्त कोल्हापूर नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक ७ ड मधील सर्वाधिक लक्षवेधी लढतीमध्ये कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुरार क्षीरसागर यांनी विजय मिळवला. ही निवडणूक अक्षरशः राज्यांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. प्रभाग क्रमांक ७ ड मधून अपक्ष विजय साळोखे रिंगणामध्ये होते.
प्रभगनिहाय विजयी उमेदवार:-
प्रभाग १: काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी , सुभाष बुचडे, पुष्पा नरूटे, रूपाली पोवार, सचिन चौगले
प्रभाग २ मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी ,वैभव माने, अर्चना पगार, प्राजक्ता जाधव, स्वरूप कदम विजयी
प्रभाग ३: भाजपचे चारही उमेदवार विजयी, प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक , वंदना मोहिते, विजेंद्र माने
प्रभाग , ४ मध्ये कॉग्रेसचे सर्व उमेदवार विजयी , राजेश लाटकर, स्वाती कांबळे, दिपाली घाडगे, विशाल चव्हाण
प्रभाग ५ मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी, विनायक कारंडे, स्वाती यवलुजे, सरोज सरनाईक , अर्जुन माने
प्रभाग ६ मध्ये कॉग्रेस तीन तर शिंदे शिवसेना १ जागेवर विजयी, कॉग्रेसच्या तेजस्विनी घोरपडे, तनिष्का सावंत , प्रतापसिंह जाधव आणि शिंदे शिवसेनेच्या शीला सोनुले
प्रभाग ७ मध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी ,यात शिंदे शिवसेनेचे ऋतुराज क्षिरसागर, मंगला साळुंखे तर भाजपचे विशाल शिराळे, दीपा ठाणेकर यांचा समावेश
प्रभाग ८ मध्ये शिंदे सेनेच्या अनुराधा खेडकर, कॉग्रेसच्या अक्षता पाटील, प्रशांत खेडकर, इंद्रजित बोंद्रे
प्रभाग ९ मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी, भाजपचे विजयसिंह देसाई, माधवी पाटील, शिंदे शिवसेनेच्या संगिता सावंत ,शारंगधर देशमुख
प्रभाग १० – महायुती ३ आणि जनसुराज्य १ , भाजपच्या अर्चना कोराणे, पुर्वा राणे, शिंदे शिवसेनेचे अजय इंगवले तर जनसुराज्यचे अक्षय जरग विजयी
प्रभाग ११ मध्ये भाजपच्या निलांबरी साळोखे , माधुरी नकाते तर कॉग्रेसच्या जयश्री चव्हाण आणि शिवसेनेचे सत्यजित जाधव विजयी
प्रभाग १२ मधून कॉग्रेसच्या अनुराधा मुळीक, स्वालिया बागवान तर शिंदे गटाचे अश्किन आजरेकर आणि अजित पवार गटाचे आदिल फरास विजयी
प्रभाग १३ मध्ये भाजपच्या माधुरी व्हटकर ,रेखा उगवे तर काँग्रेसचे प्रविण सोनावणे आणि अजित पवार गटाचे नियाज खान विजयी
प्रभाग १४ मधून कॉग्रेसचे अमर समर्थ , अब्दुल सत्तार मुल्ला, विनय फाळके तर भाजपच्या निलीमा पाटील विजयी
प्रभाग १५ मध्ये काँग्रेसचे संजय मोहिते , रोहित कवाळे, ठाकरे सेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे तर भाजपच्या सृष्टी जाधव विजयी
प्रभाग १६ मध्ये काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी दोन जागांवर विजयी, कॉग्रेसचे उमेश पोवार, धनश्री कोरवी तर भाजपचे मुरलीधर जाधव , पूजा पोवार विजयी
प्रभाग १७ मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी ,यात प्रविण केसरकर, सचिन शेंडे, शुभांगी पाटील, अर्चना बिरांजे
प्रभाग १८ मध्ये काँग्रेसच्या अरुणा गवळी, शिवसेना शिंदे गटाच्या कौसर बागवान,भाजपच्या रुपाराणी निकम,
अभिजित मोकाशी
प्रभाग १९ मध्ये कॉग्रेस आणि महायुतीच्या दोन जागा विजयी, सुषमा जरग , दुर्वास कदम काँग्रेस तर भाजपचे विजयसिंह खाडे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या मानसी लोळगे विजयी
प्रभाग २० मधून महायुती विजयी, भाजपचे सुरेखा ओटवकर ,वैभव कुंभार, नेहा तेंडूलकर तर शिंदे शिवसेनेचे अभिजीत खतकर .











