देवगड तालुक्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू

आज एकूण ९ अर्ज घेतले

देवगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने आज शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत गट व गण मिळून एकूण ९ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

यामध्ये गटासाठी एकूण ६ अर्ज घेण्यात आले असून

उबाठा – ४

इतर पक्ष – १

अपक्ष – १
असे अर्ज आहेत.

तर गणासाठी एकूण ३ अर्ज घेण्यात आले असून

उबाठा – १

भाजप – १

अपक्ष – १
असे अर्ज घेतले आहेत.

देवगड तालुक्यात त्यामुळे तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.