वाघिवरे मधलीवाडी येथे २२ रोजी श्री माघी गणेश सोहळा

चिपळूण : वाघिवरे मधलीवाडी हितवर्धक मंडळ यांच्या वतीने गुरुवार २२ रोजी वार्षिक माघी श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या कार्यक्रमात सकाळी ०५ वा. काकड आरती, सकाळी ०८ वा. श्री. गणेश जन्मोत्सव व पूजन विधी, सकाळी ११ वा. महाआरती, दुपारी १ ते १.३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ६.३०वा. . श्री गणेश पालखी मिरवणूक सह ह.भ.प. सौ. रियामाई भुवड आणि सहकारी दिंडी शोभा यात्रा,
सायं. ७.३० ते ८.३० वा. हरिपाठ, रात्री ८.३० वा. महाआरती, रात्री ९ वा. प्रमुख अतिथी सत्कार सभारंभ,
रात्री ९.३० वा. महाप्रसाद,
रात्री १० वा.काळेश्वरी भजन मंडळ वाघिवरे यांचे भजन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून
वाधिवरे सरपंच गोपाळ कदम, पत्रकार समाजसेवक ॲड संतोष (भाई) कुळे, माजी अध्यक्ष शांताराम भेकरे, पोलिस पाटील अनिल जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्थानिक, मुंबई, पुणे आणि महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.