श्री हेमंतकुमार रुपनवर यांना पीएचडी पदवी प्रदान

दापोली प्रतिनिधी: सध्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेले माळशिरस येथील श्री हेमंतकुमार दत्तात्रय रुपनवर यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाकडून नुकतीच प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी या विषयामधून कृषी अभियांत्रिकी या विभागाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी विविध धान्याच्या पफिंग व पॉपिंग साठी बॅच प्रकारच्या अर्धस्वयंचलित संयंत्राची रचना आणि विकास” या विषयावर संशोधन कार्य केले आहे. या संशोधन कार्यासाठी त्यांना महाज्योती, नागपूर यांची फेलिशिप मिळालेली होती. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. स्मिता खोडके माजी विभागप्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. अभिमान सावंत व डॉ. देबबंद्या मोहपात्रा लाभले. सह मार्गदर्शक म्हणून डॉ. रघुनाथ जायभाये, डॉ. राहुल रामटेके, डॉ. सुहास जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. उदय खोडके माजी संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता यांचे ही मार्गदर्शन भेटले. ५३ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती २०२५ द्वारे त्यांच्या या संशोधनाला नुकतीच शिफारस मिळाली आहे. पीएचडी दरम्यानच्या काळात त्यांनी आरजीएसटीसी च्या प्रोजेक्ट मध्ये सह प्रमुख अन्वेषक म्हणून ही काम केले आहे. तसेच त्यांनी” वेगवेगळ्या प्रक्रिया तंत्रांद्वारे फणसाच्या गराचे संवर्धन अभ्यास” या विषयावर डॉ. एन जे ठाकोर माजी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली एम टेक ही पदवी प्राप्त केलेली आहे. एकशिव येथील निवृत्त माध्यमिक शिक्षक श्री दत्तात्रय रुपनवर यांचे सुपुत्र व वालचंद विद्यालय व ज्यु. कॉलेज कळंब येथील प्रा. श्री मयूर रुपनवर यांचे ते बंधू आहेत आहेत. श्री रुपनवर यांच्या यशाचे कौतुक एकशिव ग्रामस्थांसह मित्रपरिवार व परिसरातून होत आहे.