कणकवली : हरकुळ बु. जंगमवाडी येथील गणेश मंदिरात २१ ते २२ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार २१ रोजी सायं. निमंत्रित भजन मंडळांची भजने होतील. गुरुवार २२ रोजी पहाटे ५.३० वा. काकड आरती, सकाळी ८.३० वा. श्री गणेश पूजन, दर्शन, ९ वा. अभिषेक, ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. श्रींची आरती, तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, ३ वा. महिलांसाठी हळदीकुंकू, सायं. ४ वा. शालेय मुलांच्या स्पर्धा, ७वा. भजनांचा कार्यक्रम, रात्री ९ वा. बक्षीस वितरण सोहळा, १० वा. श्री देव सातपाटेकर दशातवार नाट्यमंडळ, निरवडे यांचा शिवकंठ भूषण वासुकी हा प्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गणेश प्रतिष्ठानने केले आहे.












