चराठा पं. स. मतदार संघातून सौ उत्कर्षा गावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

ओटवणे (प्रतिनिधी)ओटवणे माजी सरपंच सौ. उत्कर्षां उमेश गावकर यांनी ओटवणे, चराठा, सरमळे या पंचायत समिती मतदार संघातून चराठा पंचायत समिती मधून शिवसेनेमार्फत उमेदवारी अर्ज दाखल केला असून पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिलांच्या मोठ्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्हि एम नाईक यांच्याकडे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवा तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, चराटे सरपंच प्रचिती कुबल, माजी सरपंच बाळू वाळके, सरमळे शिवसेना शाखाप्रमुख संजय गावडे,विभाग प्रमुख उमेश गावकर ओटवणे गावचे सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, गुंडू जाधव, रमेश गावकर आदींसह ओटवणे, सरमळे, चराठा गावातील शिवसेना कार्यकर्ते तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात ओटवणे,चराठा, सरमळे गावात शिवसेनेचे वर्चस्व पाहता या भागातून मोठया मताधिक्याने उमेदवार निवडून येण्याचा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.