कट्टा येथे  प्रा. मधु दंडवते यांची जयंती !

मसुरे | झुंजार पेडणेकर          :कोकण रेल्वेचे शिल्पकार

प्रा मधु दंडवते यांना

त्यांच्या १०२ व्या जयंती निमित्त कट्टा येथे आदरांजली वाहण्यात आली.

प्रारंभी प्रा. मधु दंडवते यांच्या प्रतिमेस

पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दीपक भोगटे यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या समग्र चरित्राचा आढावा घेतला. अशक्यप्राय वाटणारी कोकण रेल्वे साकारण्याचे महत्वाचे कार्य प्रा मधु दंडवते यानी केले. भारताचे अर्थमंत्री, रेल्वेमंत्री नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष

ही सर्वोच्च पदावर काम करूनही आपली साधी राहाणी व निष्कलंक चारित्र्य शेवट पर्यंत जपलं. पंचवीस वर्ष लोक सभेत

कोकणचे नेतृत्व केले. आपले सारे

जीवन सर्व सामान्यांसाठी वेचले. आपला देह सुद्धा जेजे रुग्णालयात दान केला.

आपण सर्वांनी त्यांच्या विचाराचा मागोवा घेत काम करणे हिच त्यांना आदरांजली

ठरेल असे सांगितले.

या वेळी किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, विद्या चिंदरकर,

साक्षी अमरे, मंगल पराडकर, मनोज काळसेकर, श्रीधर गोंधळी, रिया जांभवडेकर, व शिवणकाम विभागाच्या

विद्यार्थिनी उपस्थित होत्या.