वेंगुर्ले l प्रतिनिधी :आधार फाउंडेशन,सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने श्रीराम समर्थ, वेंगुर्ला पुरस्कृत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेंगुर्ले येथे पहिली जिल्हास्तरीय “संस्कृत वक्तृत्व स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.
संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी ही स्पर्धा रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वेंगुर्ला येथील नगरवाचनालय येथे होणार आहे.
स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले असून इयत्ता ५ वी ते ७ वी या गटासाठी गणपती स्तोत्र (३ मिनिटे) आणि इयत्ता ८ वी ते १० वी या गटासाठी माझी आई या विषयावर (३ मिनिटे) संस्कृत वक्तृत्व सादर करायचे आहे.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेबद्दल गोडी निर्माण होऊन तिच्या संवर्धनास चालना मिळणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहिती व नावनोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी
श्री. पांडुरंग सामंत सर ९४२०८२३०४८ तसेच
डॉ. श्री. चंदन वेंगुर्लेकर ९८२३६०४३५६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












