वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले ची कन्या ॲड. उत्कर्षा नारायण गोडकर हिने रत्नागिरी येथील श्रीमान भागोजीशेठ किर लॉ कॉलेज येथून मुंबई विद्यापिठातंर्गत नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलएल.एम. या पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५७.३० टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे.
ॲड. उत्कर्षा ही वेंगुर्ले येथील प्रसिद्ध ॲड. नारायण उर्फ श्याम गोडकर यांची कन्या असून ती आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखली सिंधुदुर्ग जिल्ह्रामध्ये वकिली व्यवसाय करीत आहे. तिने एलएल.एम.परीक्षेमध्ये क्रिमिनल लॉ ॲण्ड क्रिमिनिल ॲडमिनिस्ट्रेशन हा विशेष विषय घेऊन यश संपादन केले आहे. तसेच लॉ कॉलेजचे प्राचार्य व रिसर्च गाईड प्रा.डॉ.आशिष बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय न्याय संहितेमधील स्त्रियांच्या संदर्भातील गुन्हे म्हणजेच पती अथवा नातेवाईक यांची क्रूर वागणूक, आत्महत्येस चिथावणी व हुंडाबळी या तपास कामाविषयी प्रबंध लिहून यश संपादन केले आहे. या साठी तिला कॉलेजच्या प्रा. स्मिता कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशामुळे सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.










