आज पासून अवजड वाहने वाळू- चिरा- ट्रक – कंटेनर हा ट्रॉलर – वाहतूक हरकुल – कनेडी- कणकवली मार्गे अशी वळवली !
फक्त एसटी, दुचाकी, पर्यटकांची चारचाकी वाहने इत्यादी वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरू
पालकमंत्र्यांनी, कार्यकारी अभियंता यांना,अवजड वाहने वगळता सर्व एसटी व चारचाकी वाहतूक कायम सुरू ठेवण्याचे आदेश !
फोंडाघाट/कुमार नाडकर्णी-– अखेर ठेकेदार यांनी, ग्रामपंचायत जवळचे ब्रिटिश कालीन ब्रिज तारीख २६ जानेवारी रोजी पाडण्यास सुरुवात होणार आहे, असे सांगितले.आज दुथर्फा फलक लावून, वाहन चालकांना बांधकाम विभागाकडून नोटीस (माहिती) देण्यात आली आहे.त्यामुळे अवजड वाहने, चिरा वाळू ट्रक, कंटेनर,ट्रॉलर इत्यादी हरकुल- कनेडी – कणकवली मार्गे वळविण्यात आली आहेत. तर दुचाकी पर्यटकांच्या चारचाकी आणि एसटी वाहतूक, पर्यायी सुरक्षित- सक्षम मार्गावरून सुरू राहणार आहे..
याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिक्षक यांना समक्ष बोलवुन, ब्रिज पाडले तरी कोणत्याही परिस्थितीत एसटी आणि दुचाकी पर्यटकांच्या चारचाकी कायम सुरू ठेवा. कुणालाही त्रास देऊ नका. याबाबत संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून त्वरित कार्यवाही करा. असे आदेश दिले आहेत. याबद्दल फोंडावासियांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत …
एसटी बंद झाल्याने फोंडाघाट मधील सजग ग्रामस्थ सुरेश टक्के, सुहास मोदी अनेक अनेकांनी २६ जानेवारीला उपोषणाची नोटीस दिली होती.या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करताना एसटी गाड्या कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सुद्धा विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, व्यापारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्या चालू ठेवण्यास आणि स्थानिक प्रशासनाला अधिकार देऊन गाड्या कायम चालू ठेवाव्यात असे आदेश पत्र क्रमांक ०१/ २०२६ द्वारे दिला आहे. त्यामुळे बांधकाम विभाग, एसटी प्रशासन जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून स्थानिक पातळीवर, तातडीने, एसटी व इतर लाईट गाड्या तपासणी केलेल्या सुरक्षित पर्यायी मार्गाने कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात अशी आग्रही मागणी फोंडावासीयांनी केली आहे…










