शिवसेना मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार लुडबे यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र देत दिल्या शुभेच्छा

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार लुडबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मंदार लुडबे यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या.

तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुका प्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल.

 

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.

 

यावेळी तालुकाप्रमुख विनायक बाईत, राजा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, शिवसेना पदाधिकारी मकरंद राणे, छोटू ठाकूर, संदीप भोजणे, उमेश बिरमोळे, महेश लुडबे, सुरज बिरमोळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.