तांबुळी पं. स. मतदार संघात अपक्ष उमेदवाराचा महायुतीला पाठिंबा

महायुती उमेदवाराचा विजय निश्चित : संजू परब यांचा विश्वास

बांदा प्रतिनिधी
तांबुळी पंचायत समिती मतदार संघातील अपक्ष उमेदवार सौ. अर्चना पांगम यांनी महायुतीचे उमेदवार प्रियांका देसाई यांना आपला पाठिंबा दिला आहे. तशी माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. शिवसेना नेते आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या यशस्वी शिष्टाईने आपण महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. त्यामुळे तांबुळी पंचायत समिती मतदार संघातील लढत दुरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बिनविरोध निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, सुशांत पांगम, शिवसेना उपतालुकाप्रमुख गुरुनाथ सावंत, बांदा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, माजी सरपंच नितीन सावंत, जयेश सावंत, वाफोली उपसरपंच विनेश गवस, नेतर्डे ग्रा. पं. सदस्य कैलास गवस, सोशल मीडिया प्रमुख विराज परब, केदार कणबर्गी, साई सावंत आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. एका कर्तव्यक्षम नेतृत्वाला महाराष्ट्र मुकल्याची आदरांजली संजू परब यांनी वाहिली. सौ. अर्चना पांगम यांना पंचायत समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात येईल अशी ग्वाही संजू परब यांनी दिली.

सौ. अर्चना पांगम यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीची ताकद निश्चितपणे वाढली आहे. महायुती उमेदवार प्रियांका देसाई यांचा विजय निश्चित असल्याचे प्रमोद कामत यांनी सांगितले.