चिपळूण:
येथील खेड परिसरातील ‘धवल मार्ट’ समोर दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीवर चिपळूण पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १४:०२ वाजेच्या सुमारास घडली असून, रात्री १८:५१ वाजता याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद चंद्रकांत सावंत (वय ४३ वर्ष, रा. निवहाळ भैरीचीवाडी, ता. चिपळूण) हा आरोपी धवल मार्ट येथे मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा आणि गैरवर्तन करत होता. यावेळी डायल ११२ च्या ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक भरतेश हारूगिरे आणि पोहेडकॉक/३६८ आंबेरकर हे लोकसेवक आपले कर्तव्य बजावत असताना आरोपीने त्यांना सहकार्य न करता उलट त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका चंद्रकांत मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१)(२) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२१ नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.











