महायुतीने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांना निवडून द्या : पालकमंत्री नितेश राणे

परुळे l प्रतिनिधी :जिल्हा परिषदेच्या ५० आणी पंचायत समितीच्या १०० पैकी १०० जागा महायुतीच जिकंणार आहे. संसद ते ग्रामपंचायत सर्व सत्तास्थाने एकाच विचाराच्या पक्षाकडे असावी यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी परुळेबाजार येथील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत केले. तसेच मतदारांनी कोणताही संभ्रम मनात न ठेवता महायुतीने जे जाहीर केले आहेत तेच अधिकृत उमेदवार आहेत असेही स्पष्ट केले.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपा नेते पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांची संयुक्त जाहीर प्रचार सभा परुळेबाजार वराठी मंदिर मंगल कार्यालयात पार पडली. म्हापण जिल्हा परिषद साठी शिवसेनेच्या यज्ञा साळगांवकर, म्हापण पंचायत समिती साठी भाजपचे विष्णु उर्फ आपी फणसेकर आणि परुळे पंचायत समिती साठी शिवसेनेचे सचिन देसाई यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, तिन्ही उमेदवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

परुळे येथील सभेंत बाोलनाना मंत्री राणे म्हणाले की, या ठिकाणी मतदारांमध्ये संभ्रम आहे असे भासवले जात आहे. पण महायुतीचे नेते नारायण राणे साहेब यांनी यादी अंतिम केली तीच अधिकृत आहे. त्यामुळे उमेदवारांबाबत संभ्रम निर्माण व्हायला नाही पाहीजे. यापूर्वी जिल्ह्यात अनेक महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. या मतदारसंघान जी कामे करावयाची आहेत ती माझ्याच खात्याअंतर्गत येतात. त्यामूळे निधीची उणीव भासणार नाही. चिपी विमानतळावर नाईट लॅण्डींग ची परवानगीने हा विमानतळ २४ तास खुला राहणारा आहे. तसेच मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, इंडिगो कंपनीशी बोलणे अंतिम टप्प्यात आहे. तरी आपण मतदार यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार यांना निवडून देण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले.

*महायुतीच्या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या : दीपक केसरकर*

म्हापण जिल्हा परिषद व परुळे पंचायत समिती मतदारसंघात संभ्रम निर्माण करण्यात आले आहेत. तो दूर करण्यासाठी पालकमंत्री या जाहीर सभेला आले आहेत. महायुतीच्या उमेदवार यांना आपण निवडून दिल्यावर या मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी राहील. पर्यटन दृष्या विकसित होणाऱ्या या मतदार संघातील विमानतळा वरून मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यानी प्रयन्न करावे तसेच या भागातील मतदारांनी महायुतीच्या तीन ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडुन घ्यावे असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले.