रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील मावळंगे येथे मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या वृध्देने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 25 जुलै रोजी सकाळी 6.15 ते 6.45 वा.कालावधीत उघडकीस आली आहे.
संगिता गजानन नेने (68,रा.नेनेवाडा मावळंगे,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृध्देचे नाव आहे.याबाबत त्यांच्या मुलीने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानुसार,त्यांची आई संगिता नेने यांना वयोमानामुळे झोप लागत नव्हती तसेच घरी एकटीच रहात असल्याने चिडचिडपणा करत होत्या.या मुळेच त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिडल्यामुळे त्यांनी आजारपणाला कंटाळून मंगळवारी सकाळी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.याबाबत पूर्णगड पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











