​सावंतवाडी पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचीच बाजी

भाजपा ६ शिवसेना ६
उबाठा १ तर ५ अपक्षांचा विजय

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल आज जाहीर झाला. सावंतवाडी तालुक्यातील १७ पंचायत समिती गणांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. यामध्ये एकूण १३ जागावर महायुतीने विजय मिळवला तर ५ ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी व एका जागी उबाठाने खाते खोलले.
​माडखोल गणात अपक्ष उमेदवार अवनी अमित राऊळ यांनी १९२० मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या अनिता राऊळ (१२१६ मते) यांचा पराभव केला. तर
​​कलंबिस्त गणातही अपक्ष उमेदवाराचा करिष्मा पाहायला मिळाला. प्रथमेश प्रभाकर सावंत यांनी २६१५ मते मिळवून विजय मिळवला, तर शिवसेनेचे (उबाठा) रामाकांत राऊळ १४१९ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

​आंबोलीत शिवसेनेचे मायकल कोजमा डिसोजा २०६७ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भाजपच्या शशिकांत गावडे (१६५० मते) यांचा पराभव केला. तर ​विलवडे गणात भाजपचे प्रशांत प्रभाकर सुकी २१४३ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या दीनानाथ कशाळकर (१५९३ मते) यांचा पराभव केला.

​​कोलगाव येथे शिवसेनेच्या प्रणाली विजय टिळवे (१९१३ मते) यांनी भाजपच्या संध्या हळदणकर (१८०२ मते) यांचा निसटता पराभव केला. तर ​कारिवडेत भाजपच्या प्राजक्ता प्रदीप केळुसकर १५६० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष आरती गावडे १२८३ यांचा पराभव केला.
​
​तळवडे गणात शिवसेनेच्या सुस्मिता सुधाकर जाधव २६११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी आपल्या निकटच्या प्रतिस्पर्धी उबाठाच्या ​श्वेता जाधव १९८३ यांचा पराभव केला. मळगावमध्ये भाजपचे गौरव गोपाळ मुळीक २८४६ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उबाठाचे उमेदवार पांडूरंग राऊळ यांना २०१४ मते मिळाली.

माजगांव पंचायत समिती मतदार संघात अपक्ष जितेंद्र गांवकर २०२३ यांनी भाजपचे उमेदवार सचिन बिर्जे १०५२ यांचा पराभव केला. तर चराठा पंचायत समितीत शिवसेनेच्या उत्कर्षा गांवकर १५९१ यांनी अपक्ष समिक्षा गांवकर ७५९ यांना पराभूत केले.

इन्सुली पंचायत समिती मतदार संघात अपक्ष सदाशिव राणे १८५४ यांनी भाजपचे विठ्ठल पालव ९७१ यांचा पराभव केला. शेर्ले पंचायत समितीत भारतीय जनता पार्टीचे महेश धुरी हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते .

​ ​न्हावेलीत शिवसेनेचे शरद जयदेव थाऊसकर १८५५ मते मिळवून विजयी झाले, त्यांनी भाजपच्या अष्टविनायक धाऊसकर (१५८१ मते) यांना पराभूत केले. तर मळेवाड येथे भाजपच्या उमेदवार धनश्री मराठे २६४५ यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी उबाठा गटाच्या उमेदवार मनीषा गोवेकर ८८५ यांचा मोठया फरकाने पराभव केला.

​आरोंदा गणात भाजपच्या नेहा नारायण कांबळी (१४८७ मते) यांनी शिवसेनेच्या (उबाठा) सुवर्णा तिरोडकर (१४०३ मते) यांचा पराभव केला. तर सातार्डा पंचायत समितीत उबाठाचे उदय पारिपत्ये यांनी १६८१ मते मिळवीत त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शेखर मांजरेकर १२४७ यांचा पराभव केला.

बांद्यात अपक्ष उमेदवार ऋतिका संदेश नाईक यांनी १८८० मते मिळवून भाजपच्या रुपाली शिरसाट (१४९८ मते) यांना पराभवाचा धक्का दिला.
​