लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामविकास मंडळ खेरवसेच्या वतीने दिनांक शनिवार १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत श्री स्वयंभू शंकर देवालयाचा महाशिवरात्र उत्सव व वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
ग्रामविकास मंडळ खेरवसेच्या वतीने सलग सतराव्या वर्षी हा स्वयंभू शंकर देवालयाचा महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पूजा पाठ, नऊ वाजता पालखीला रुपये लावणे, बारा वाजता पूजा पाठ व आरती, ३ ते सायंकाळी ६ हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी सात ते रात्री साडेनऊ भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतील .तर रात्री ११ वाजता कोलधे येथील नमनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी पूजा पाठ, नऊ वाजता स्वयंभू शंकराला महा अभिषेक, दुपारी बारा वाजता आरती व भजन त्यानंतर सायंकाळी सात ते दहा या वेळेत खेरवसे येथील वारकरी संप्रदायाचा हरिपाठ व त्यानंतर पालखी प्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री ११ वाजता जादुगार उदय कुमार यांचे जादुचे प्रयोग होणार आहेत.
सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पूजा पाठ, नऊ वाजता आरती व भजन, त्यानंतर दुपारी १ ते ३ महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८.३० ते १० वाजता भजन आणि रात्री ११ वाजता नाट्य प्रयोग सादर केला जाणार आहे.
अशाप्रकारे या उत्सवाचे मंडळाचे हे १७ वे वर्ष असल्याने या उत्सवाला भक्तांच्या आणि भाविकांच्या, ग्रामस्थांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले आहे. या निमित्ताने संपूर्ण मंदिराभोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार असून मंदिर परिसर यामुळे रोषणाईने उजळून निघणार आहे या स्वयंभू शंकर देवालय शिवरात्री उत्सवासाठी ग्रामविकास मंडळ खेरवसेचे सर्व पदाधिकारी, गाव प्रमुख आणि ग्रामस्थ हे मेहनत घेत आहेत.
Home महत्वाच्या बातम्या श्री स्वयंभू शंकर देवालय खेरवसेचा महाशिवरात्री उत्सव १४ ते १६ फेब्रुवारी रोजी












