सुहास गवंडळकर : प्रणव वायंगणकर : गौरी माईणकर : सचिन शेट्ये : गौरी मराठे व रिया केरकर यांना संधी
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. पाणीपुरवठा व जलनिस्साःरण समिती सभापतीपदी विनायक उर्फ सुहास गवंडळकर, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी प्रणव वायंगणकर, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पदी गौरी माईणकर, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदी सचिन शेट्ये तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदी गौरी मराठे व उपसभापतीपदी रिया केरकर यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीचे सभापती हे पदसिद्ध नगराध्यक्ष असणार असून पाचही समित्यांचे सभापती हे या समितीचे सदस्य राहणार आहेत.
वेंगुर्ले नगरपरिषदेतील विषय समिती सभापती निवड प्रक्रिया आज नगरपरिषद सभागृहात मंगळवारी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष दिलीप लक्ष्मण गिरप, उपनगराध्यक्ष विनायक उर्फ सुहास गवंडळकर तसेच नगरसेवक लीना म्हापणकर, रविंद्र शिरसाट, गौरी माईणकर, प्रितम सावंत, गौरी मराठे, आकांक्षा परब, तातोबा पालयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, विनय नेरुरकर, रिया केरकर, सदानंद गिरप, काजल कुबल, सचिन शेट्ये, सुमन निकम, संदेश निकम, युवराज जाधव, समिधा रेडकर, प्रणव वायंगणकर, शितल आंगचेकर, प्रशांत आपटे व यशवंत उर्फ दाजी परब तसेच अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा व जलनिस्साःरण समिती
श्री. विनायक उर्फ सुहास गवंडळकर ( सभापती) तर काजल कुबल, प्रितम सावंत आणि लीना म्हापणकर सदस्य.
सार्वजनिक बांधकाम समिती
प्रणव वायंगणकर (सभापती) तर सदानंद गिरप, रविंद्र शिरसाट व लिना म्हापणकर सदस्य
स्वच्छता व आरोग्य समिती
गौरी माईणकर (सभापती) तर विनय नेरुरकर, युवराज जाधव व समिधा रेडकर सदस्य
क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती
सचिन शेट्ये ( सभापती) तर सदानंद गिरप, तातोबा पालयेकर व संदेश निकम सदस्य
महिला व बालकल्याण समिती
गौरी मराठे (सभापती), रिया केरकर (उपसभापती) तर आकांक्षा परब, सुषमा प्रभूखानोलकर व सुमन निकम सदस्य निवडण्यात आले आहेत.
निवड प्रक्रियेनंतर मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी प्रशासनातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले. त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेनेचे अजित राऊळ, सत्यवान साटेलकर, वासुदेव केरकर यांनी ही अभिनंदन केले.













