६०० कोटी वर प्रारूप आढावा गेला त्या बद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन केले पाहिजे असा प्रस्ताव आमदार निलेश राणे यांनी मांडला. त्यावर पालकमंत्री नितेश राणे म्हणले खासदार नारायण राणे यांच्या संकल्पना विकासाच्या आहेत. त्यांना अपेक्षित असलेल्या दरडोई उत्पन्न जिल्ह्यातील जनतेचे वाढले पाहिजे त्यासाठी हे प्रयत्न आहेत. पर्यटन जिल्हा असल्याने लोक येथे पर्यटकांना सेवा देण्यासाठी सर्वांगीण सुविधा दिल्या पाहिजेत. प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे आणि सर्वांगीण सेवा दिल्या पाहिजे. असे असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान आमदार निलेश राणे यांनी कमाल मर्यादा ठरवा आणि अधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे सूचित केले.












