आरोग्य विभागाचे जिल्हा नियोजन सभागृहात धिंडवडे,मंत्री नितेश राणे यांनी धरले धारेवर

 

ओरोस :रुग्णाच्या आजारांचे किमान निदान केले जात नाही. पेशंट थेट दुसरीकडे गोव्याला,कोल्हापूर मध्ये पाठवले जातात. योग्य निदान केले जात नाही.सेवा मिळत नाही.लोक कंटाळले आहेत. सेवा मिळत नाही. अधिकाऱ्यांच्या मानसिकतेला आजार झाला आहे.त्याने आम्ही काय करणार. सर्व औषध,यंत्रणा दिली तरी अधिकारी असलेले डॉकटर कामच करत नसतील तर जनतेला सेवा कशी मिळणार. ही तुमची मानसिकता बदलणार कधी अशा शब्दात मेडिकल कॉलेजच्या अधिकारी डीन,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी अशा सर्वांनाच धारेवर धरले.

दरम्यान आमदार निलेश राणे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करताना गोव्याला पेशंट पाठवून तुम्ही जनतेला त्रास देता.टूमर झालेला असताना महिलेला प्रेग्नेंट आहे असे सांगून गोव्याला पाठवले.असे प्रकार जिल्हा मेडिकल कॉलेज मध्ये सुरू आहेत. अनेक प्रकार हे मी सभागृहात बोलाव तर फारच त्रास होईल असे सांगितले.