शासन आपल्या दारी अंतर्गत जातीचे व उत्पन्नाच्या भरले अर्ज
संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील आकले येथील मोहन विद्यालय आकले येथे कातकरी आदीम जमाती करीता आदिवासी संशोधन संस्था पुणे, सहयोग सेवाभावी संस्था नांदेड , आणि शासन आपल्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी आदीम जमाती मधील गावांसाठी सर्वेक्षण करून आदीम जमाती आरोग्य व पोषण उपक्रम अंतर्गत आरोग्य शिबिराचे व शासकीय लागणारे कागदपत्र यांचे आयोजन करण्यात आले होते .
चिपळूण तालुक्यातील आकले, नांदीवसे, कादवड, निरबाडे, ओवळी, तिवरे आणि इतर गावांमध्ये कातकरी समाज समाजाच्या वस्त्या आहेत. या समाजाला आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. अन्न, पाणी, निवारा आणि त्याचबरोबर शिक्षण सारख्या गोष्टीसाठी सुद्धा आदिवासी अजून वंचित राहिला आहे. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आता शासनाने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. देशाच्या राष्ट्रपती सुद्धा द्रौपदी मूर्मु या आदिवासी समाजातील असल्यामुळे निश्चितच आदिवासी समाजाकडे व त्यांच्या विकासाकडे लक्ष देतील अशी आशा सुद्धा या आदिवासी कातकरी समाजाला आहे.
या समाजासाठी आदिम जमाती आरोग्य व पोषण उपक्रम अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन आकले येथे करण्यात आले होते.
डॉ. श्वेता देशमुख यांच्या हस्ते निसर्ग माता प्रतिमेची पूजा करून या आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आदिवासी आदिम कातकरी बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला. विकास निकम व समीर पवार यांनी देखील या आरोग्य शिबिराच्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.
डॉ. श्वेता देशमुख यांनी आरोग्य व पोषण या बाबतीत तसेच आयुष्यमान भारत योजना व नशेचे दुष्परिणाम या बाबतीत महिला व पुरुष यांना मार्गदर्शन केले.
सदर आरोग्य शिबिरा मध्ये आकले, तिवरे, कादवड, निरबाडे, कोंढे,ओवली , नांदिवसे, निरबाडे या गावातील शिबीरासाठी आदिवासी कातकरी बांधवांनी उपस्थित लावली होती. लहान बालकांचा शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या शिबिराला ३०० लोकांची तपासणी महिला -पुरुष यांची झाली. शासन आपल्या दारी या योजनेतून जातीचे दाखलेचे १०० अर्ज भरून घेतले उत्पन दाखल्यांचे ५० अर्ज भरण्यात इत्यादि दाखल्याची माहिती देण्यात आली.
या आरोग्य शिबिराला डॉ. श्वेता देशमुख, कादवड
सरपंच श्रीम. सुवर्ण सकपाळ,
उप सरपंच महेश जाधव, आकले नितेश निकम,
आरोग्य सहाय्यक राजेंद्र मोलाज, आरोग्य सेविका
सौ. उषा जाधव ,
. सौ. अश्विनी खडारे
पद्माकर घाडगे (ANM),
सौ. स्वाती शिगवण,
. तलाठी सौ. एस व्ही.तटकरी,
मंडळ अधिकारी एस . आर. आयरे
आशा सेविका सौ. रेश्मा शिंदे,
सौ. गोगोत्री गजमल
.सायली कदम,
ग्रामसाथी चिपळूण . महेश जाधव . विठ्ठल निकम,
आरोग्यदुत . बाबू वाघे
श्री आशा चव्हाण,
श्री.सजय जगताप,
श्री. चंद्रकांत जाधव (आ. सं. रत्नागिरी सचिव आदी उपस्थित होते.
संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव आणि पदाधिकारी यांनी आरोग्य शिबिरासाठी प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.












