संचालकास बेशुद्ध होईपर्यंत मारहाण…
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापुर: भोगावती सहकारी साखर कारखान्यात संचालक मंडळ आणि अंतर्गत राजकारणामुळे दोन संचालकांत तुफान हाणामारी झाली.
कारखान्याच्या कार्यालयातच जोरदार हाणामारी झाली.या घटनेत सुनील खराडे आणि धीरज डोंगळे यांच्यात टेंडर वाटप, कारखान्यातील अंतर्गत राजकारण, सत्तेसाठीची चढाओढ आणि साखर विक्री/निर्णयांवरून तसेच कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर बदनामीचे आरोप आणि अपात्र सदस्यांचा मुद्दा तापल्यामुळे वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.त्यानंतर संचालक धीरज डांगळे घोटवडे येथील त्यांचे काही कार्यकर्ते कारखान्यावर दाखल झाले.या नंतर दोन गट समोरा समोर आल्याने वातावरण तापले.यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोघांच्यात झालेला वाद थेट रस्त्यावर आला आणि त्यानंतर कपडे फाटेपर्यंत मारामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भोगावती सहकारी साखर कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.













