तळवली डावलवाडी येथे उद्या शिवजयंती सोहळा

गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे मार्गदर्शन

गुहागर | प्रतिनिधी :
तालुक्यातील तळवली डावलवाडी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमाने शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे.

गुहागर तालुक्यातील तळवली डावलवाडी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यावेळी उद्या गुरुवार दिनांक 19 रोजी सकाळी दहा वाजता सिद्धिविनायक मंदिर तळवली येथून शिवम विशाल आगमन, सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन, सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे मार्गदर्शन, सकाळी 12 वाजता विद्यार्थी व शिवभक्त यांच्याकडून राजांचा गुणगान सोहळा, सायंकाळी चार वाजता राजांची भव्य शोभायात्रा, सायंकाळी सात वाजता मळण येथील शिवकालीन मर्दानी खेळ पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गजानन नाट्य मंडळ तळवली डावलवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.