चिपळुणात २२ रोजी सांगीतिक श्रद्धांजली कार्यक्रम

चिपळूण (वार्ताहर) : ज्येष्ठ तबलावादक पंडित अरविंद मुळगावकर यांच्या स्मृतिपितार्थ संगीत जरा प्रस्तुत सांघिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रविवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता रोहिदास भवन मार्कंडी येथे करण्यात आले आहे.

चिपळुणातील ढोलकी पट्टू यदुवीर चोगले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या संगीतमय कार्यक्रमात प्रथम सत्रात तबला सहवादन होईल. यामध्ये संगीत झरा तबला वादनात ढोलकी क्लासेस चिपळूणचे विद्यार्थी सहभागी होतील. त्यानंतर विद्याभारती भारतीय शिक्षा मंडळ शिरळ येथील विद्यार्थी तबला सहवादनामध्ये सहभागी होतील. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये एकल तबलावादन कार्यक्रम होईल. यामध्ये पंडित अरविंद मुळगावकर यांचे शिष्य वैष्णव चव्हाण हे तबलावादन करतील. शास्त्रीय गायनामध्ये विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांच्या शिष्या सुश्री धनश्री अभ्यंकर या गायन करतील. कार्यक्रमात संवादिनी म्हणून अमित ओक व श्रेयस जंगम भूमिका पार पाडतील. निवेदक म्हणून मयुरेश भागवत हे काम पाहणार आहेत. या संगीतमय कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.