ध्रुव चषक स्पर्धेस आमदार निलेश राणे नी उपस्थित राहत दिल्या शुभेच्छ .ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर आणि मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशा ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कुडाळ मालवण चे आमदार शिवसेनेचे फायरब्रँड नेते निलेश राणे साहेब यांनी उपस्थिती दर्षवत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देताना आमदार साहेबांनी आपलं क्रिकेट वरच प्रेम व्यक्त केलं आपण प्रेमाने बोलावलं त्यामुळे व्यस्त असतानाही यावं लागल अशा भावना व्यक्त करताना बबलू गावकर कला क्रीडा, सामाजिक क्षेत्रात जे योगदान देत आहेत त्यासाठी कौतुक करताना आपल्या कायम आपणास शुभेच्छा असल्याचे सांगतानाच बबलू गावकर मित्रमंडळालाही शुभेच्छा दिल्या.यावेळी बबलू गावकर, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर, पंचायत समिती सदस्या उत्कर्षां गावकर यांनी त्यांचे स्वागत केले.आमदार निलेश राणे साहेबांचा सत्कार करण्यात आला.त्यांच्या सोबत उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख संजू भाई परब हेही उपस्थित होते त्यांनीही स्पर्धेला शुभेच्छा दिल्या यावेळी विद्याधर परब, सुरज परब नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दादा साईल आदी मान्यवर उपस्थित होते.













