यशवंत मेमोरियल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने शिबिराचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : यशवंत मेमोरियल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने उंबर्डे येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन जि.प.सदस्या श्रावणी रोहन रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील गरजू रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिराचा फायदा वयोरुद्ध नागरिकांना चांगला झाला. आरोग्यसेवा ही समाजसेवेची खरी ओळख असून अशा उपक्रमांमुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा आधार मिळतो, असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषणात केले.
ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा उद्देश ठेवून राबविण्यात आलेल्या या शिबिराबद्दल ग्रामस्थांनी यशवंत मेमोरियल ट्रस्टचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी जि.प.सदस्या श्रावणी रावराणे, पं. स. सदस्या साची कोलते, उंबर्डे सरपंच वैभवी दळवी, माजी वित्त व बांधकाम सभापती सिंधुदुर्ग जयेंद्र रावराणे, नॅबचे तज्ज्ञ डॉक्टर डॉ. विपुल गांधी (मुंबई),
उपसरपंच सतीश तुळसणकर,
शेरपुद्दीन बोबडे सर,
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील नेवरेकर,
उंबर्डे कुंभार समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव नेवरेकर,
माजी उपसरपंच श्रीधर खेडेकर,
अनिल पाटील, संतोष नेवरेकर, रत्नाकांत बंदरकर तसेच उंबर्डे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदेश तुळसणकर यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचेपदाधिकारी, डॉक्टर, स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.











