मसुरे | झुंजार पेडणेकर :कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय या शासनमान्य सार्वजनिक वाचनालयामध्ये दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०- ०० ते १२- ०० या वेळात मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध विषयावरील ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. वाचकांमध्ये तसेच विद्यार्थी व युवावर्गामध्ये वाचनाची अधिकाधिक आवड निर्माण व्हावी व त्यांचा कल वाचनाकडे वाढून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उदात्त हेतूने राबविलेल्या या ग्रंथ प्रदर्शनास जास्तीत जास्त संख्येने वाचकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.










