रत्नागिरी पंचायत समिती सभापतीपदी प्रविण धोंडू पांचाळ बिनविरोध

गजानन धर्माजी धनावडे यांची उपसभापतीपदी निवड 

रत्नागिरी । प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्याच्या पंचायत समिती सभापती पदी श्री. प्रविण धोंडू पांचाळ यांची बिनविरोध निवड झाली

तर श्री. गजानन धर्माजी धनावडे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली.

राज्याचे उपमुख्य मंत्री तथा पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणेच धक्कातंत्र राबवत पालकमंत्री उदय सामंत यांनी ही दोन नावे रविवारी रात्री उशिरा घोषित केली आणि सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले

यामधे सभापतिपदासाठी पंचायत समिती सदस्य कांचन नागवेकर आणि उपसभापतीपदासाठी स्वप्नील मयेकर यांनी सूचक म्हणून काम केले तर उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले