राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या नंदिनी कदम व उपसभापतीपदी भाजपाचे अभिजित गुरव यांची बिनविरोध निवड

पंचायत समितीत आता लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

राजापूर (प्रतिनिधी): येथील तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या नंदिनी नितीन कदम यांची तर उपसभापतीपदी भाजपाचे अभिजित यशवंत गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती व उपसभापती निवडीमुळे गेली चार वर्षे तालुका पंचायत समितीवर असलेली प्रशासकिय राजवट संपुष्टात आली असून लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाला आहे.
या दोन्ही पदांसाठी एकास एक अर्ज आल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅसमीन यांनी सभापदीपदी नंदिनी कदम व उपसभापती पदी अभिजित गुरव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
जिल्हयातील सर्व पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहिर झाला होता. सोमवारी ९ मार्च रोजी जिल्हयातील सर्व पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदांची निवड प्रक्रिया पार पडली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत जिल्हा परिषदेसह जिल्हयात चिपळूण वगळात अन्य सर्वच पंचायत समितीवर शिवसेना भाजपा महायुतीने निर्वीवाद वर्चस्व प्रस्थापीत केले होते.
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी यापुर्वीच जि. प. व पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीत गटनेते व पक्ष प्रतोतांची निवड करताना सभापती व उपसभापदी पदांवर सगळयांना संधी देता यावी यासाठी हा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असेल असे जाहिर केले होते.
त्याप्रमाणे त्यांनी रविवारी पुढील सव्वा वर्षासाठी शिवसेना भाजपा महायुतीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या उमेदवारांची यादी जाहिर केली होती.
राजापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी नाटे पंचायत समिती गणातुन निवडून आलेल्या नंदिनी कदम यांचे नाव जाहिर करण्यात आले. सौ. कदम या शिवसेना पुरस्कृत अपक्ष म्हणून या गणातुन विजयी झाल्या होत्या. तर उपसभापती पदासाठी धोपेश्वर पंचायत समिती गणातुन निवडून आलेले भाजपाचे अभिजित गुरव यांचे नावे जाहिर केले होते.
सोमवारी पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रियेता सभापतीपदासाठी सौ. कदम यांनी तर उपसभापतीपदासाठी गुरव यांनी अर्ज दाखल केले होते. याप्रसंगी शिवसेना पक्ष निरिक्षक विलास चाळके, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश कुवळेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, जिल्हा उपाध्यक्ष अशफाक हाजू, तालुका प्रमुख दिपक नागले, जिल्हा बँक संचालक महेश खामकर, माजी जि. प. सदस्य आबा आडीवरेकर भाजपाच्या महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, तालुका प्रमुख मोहन घुमे, एड. एकनाथ मोंडे, भास्कर सुतार, भाजपा महिला आघाडीच्या श्रृती ताम्हनकर, संदेश विचारे, ओम गुरव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कदम व गुरव यांचे अभिनंदन केले. तर प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी संतोष मेहेत्रे व सहाय्यक गटविकास अधिकारी नितिन जगताप यांनी अभिनंदन केले.
या दोन्ही पदांसाठी एकास एक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केली. आमदार किरण सामंत हे अधिवेशनासाठी मुंबईत असल्याने त्यांनी तेथूनच सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या.