दापोली (विशेष प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख श्री उन्मेषजी राजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी सौ. नम्रता तोडणकर यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे दापोली तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दापोली पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेल्या प्रक्रियेनंतर श्री उन्मेष राजे यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर सौ. नम्रता तोडणकर यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून दापोली तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हर्णै गटाच्या वतीने दोन्ही नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रभावीपणे काम करावे, तसेच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
शिवसेना हर्णै गटाच्या वतीने उन्मेष राजे आणि नम्रता तोडणकर यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी भगव्या शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुक्याचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.












