देवली ग्रामपंचायत येथे महिला दिन उत्साहात साजरा

गावातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान : ग्रामस्थ महिला भगिनींची उस्फुर्त उपस्थिती 

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील देवळी ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देवली ग्राम सचिवालय येथे आयोजित या कार्यक्रमात ग्रामस्थ महिला भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.

 

गावातील काही कर्तृत्ववान महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या प्राध्यापिका सौ. सुमेधा नाईक मॅडम, देवली गावामध्ये अशा सेविका म्हणून ज्यांनी कित्येक वर्षे काम पाहिल्या त्या वंदिता चव्हाण, गेल्या वर्षी दहावी मध्ये भंडारी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत कुमारी जानवी प्रमोद चव्हाण उत्तम गुण संपादन करून उत्तीर्ण झाली. या सर्व कर्तुत्ववान महिलांचा गावातील समस्त महिला वर्गाच्या वतीने प्रतिनिधिक सन्मान करण्यात आला.

 

सरपंच शाम वाक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्या सौ. रुपल आचरेकर, सौ. मेघा पाटकर, दीपिका सारंग ग्राम अधिकारी श्री घंटे यांसह आणि गावातील सर्व माता भगिनी उपस्थित होत्या. देवबाग गावचे सुपुत्र लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सूत्रसंचालन केले.