मसुरे | झुंजार पेडणेकर : आरसीएफ कंपनी चेंबूर मुंबई येथे महिला दीना निमित्त आयोजित काव्य आणि घोषवाक्य स्पर्धेत मसुरे देऊळवाडा गावचे सुपुत्र वरिष्ठ अभियंता (के), नायट्रिक ऍसिड ग्रुप ऑफ प्लांट्स, आरसीएफ लिमिटेड राजेश मेस्त्री यांनी कवितेसाठी प्रथम पारितोषिक आणि घोषवाक्यसाठी प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. RCF चेंबूर, मुंबई येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विनीता साहू, एसीपी, मुंबई पोलिस आणि आरसीएफ सीव्हीओ डॉ. राहुल जगताप यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.











