चिंदर नं.१ शाळेत महिला दिन विविध कार्यक्रमानी साजरा !

मसुरे | झुंजार पेडणेकर :   चिंदर शाळा नं.१ येथे जागतिक महिला दिनानिमित्त निपुण माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन जि.प.सदस्य श्रीम.वर्षा सांबारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर नूतन पंचायत समिती सदस्य श्री. दिपक सुर्वे,श्रीम.चिन्मयी पाताडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री. देवेंद्र हडकर सोसायटी चेअरमन, श्रीम.शितल माडये केंद्रप्रमुख चिंदर, श्री.मधु पाताडे, श्री.अरविंद घाडी,श्री.रावजी तावडे,श्री.पंढरीनाथ करवडकर,श्री.दिनेश पाताडे,डॉ.मुजावर मॅडम,डॉ. घाटगे,दामिनी पथक प्रमुख श्रीम.देसाई मॅडम,श्रीम.परब मॅडम,श्रीम.अनिता जाधव,माजी सभापती हिमाली अमरे,श्रीम. जान्हवी घाडी,आदी उपस्थित होते. या प्रसंगी नूतन जि.प.,पं.स.सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच निपुण माता गटांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. गावातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी दामिनी पथकाद्वारे महिलांच्या सुरक्षेबाबत देसाई मॅडम यांनी उपस्थित महिलाना माहिती दिली. तर प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा यांच्या मार्फत डॉ. मुजावर मॅडम यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले व शासकीय योजनांची माहिती दिली.

महिलांसाठी खास आकर्षण म्हणून खेळ पैठणीचा हा स्पर्धात्मक खेळ आयोजित केला होता. यामध्ये ८० महिलानी सहभाग घेतला. या खेळाच्या अंतिम चार विजेत्या पुढीलप्रमाणे- चतुर्थ क्रमांक श्रेया मालवणकर,तृतीय क्रमांक प्रणाली घाडी,द्वितीय क्रमांक उर्मिला मुणगेकर तर या खेळाची प्रथम क्रमांकाची मानकरी नेहा पावसकर ठरल्या. विजेत्याना श्री. दिपक सुर्वे व श्री देवेंद्र हडकर पुरस्कृत मानाची पैठणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.या संपूर्ण कार्यक्रमासाठी चिंदर केंद्रातील सर्व शिक्षिका,अंगणवाडी सेविका/मदतनीस,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामस्थ,पालक,आजी-माजी विद्यार्थी, दिपक तावडे व गिरीश पवार,भाई अपराज,विजय घाडी,अभय पाडावे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी दिपक सुर्वे,श्री.देवेंद्र हडकर यांनी बक्षिसे भेट वस्तु व अल्पोपहारसह आयोजनाचा खर्च केला तसेच मा.श्री.केदार परूळेकर ग्रामपंचायत सदस्य यांनी महिलांसाठी भेटवस्तु दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गाड यांनी केले पंच म्हणून श्रीम वझे,श्रीम.चव्हाण,श्रीम.पवार,श्रीम.विभूते,श्रीम.भायमारे,श्रीम.संगीता परब,समिरा घाडी,श्री. तवटे,श्री.जुंदळे,श्री.जाधव यांनी काम पहिले तर आभार श्री. तवटे यांनी मानले.