रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा ‘पोलिस शिपाई’ पदासाठीची लेखी परिक्षा रविवार 15 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वा. शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील फिनोलेक्स कॉलेज आणि शहरातील थिबा पॅलेस येथील श्री शामराव पेजे,शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन परिक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
या पोलिस शिपाई पदांसाठी घेण्यात आलेल्या शारिरीक चाचणी प्रक्रियेनंतर लेखी परिक्षेसाठी 786 पुरुष आणि 317 महिला अशा एकूण 1103 पात्र उमेदवारांची ही लेखा परिक्षा घेण्यात येणार आहे. पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधिक्षक बी.बी.महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण ‘लेखी परीक्षा’ प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शिस्तबध्द पध्दतीने घेण्यात येणार आहे.












