आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ ते १९ मार्च दरम्यान विविध कार्यक्रम

एन. आर. प्रतिष्ठान, राजापूर व रविदादा सहयोगी मित्रमंडळ यांच्यावतीने आयोजन

राजापूर प्रतिनिधी

माजी खासदार व आमदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च २०२६ ते १९ मार्च २०२६ रोजी एन. आर. प्रतिष्ठान, राजापूर व रविदादा सहयोगी मित्रमंडळ यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ रोजी सकाळी ९ वा. फळ वाटप ग्रामीण रुग्णालय राजापूर, सकाळी १० वा. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राजीवगांधी मैदान, राजापूर, १८ मार्च २०२६ : तालुक्यातील दुर्गम भागातील ४५ अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप, १९ मार्च २०२६ : रक्तगट व हिमोग्लोबीन (महिला) तपासणी शिबीर, मराठे कॉलेज राजापूर.
तरी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती एन. आर. प्रतिष्ठान, राजापूर व रविदादा सहयोगी मित्रमंडळ यांच्यावतीने रवींद्र नागरेकर, वसंत पाटील, समिर खानविलकर, समिर शिंदे, अमर वारिसे, दीपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, विद्या राणे, जब्बार काझी, जिलानी काझी, अजित धावडे, देसाई प्रसाद, राजा खानविलकर, संदेश आंबेकर, आशिष मालवणकर,, शरद घरकर, अजय डांबे, संजय ओगले, चंद्रकांत शिंदे, विलास आंबेलकर, विजय गुरव, विनायक कुवेसकर, सचिन शिवणेकर, सादत हबीब, नजीर टोले करण्यात आले आहे.