रत्नागिरी : खरीप हंगाम सन 2023-24 सर्व समावेशक पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिली.
खरीप हंगाम सन 2023-24 सर्व समावेशक पीक विमा योजनेत 30 जुलैअखेर जिल्हयातील 8329 शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे. उर्वरित जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्याकरिता 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीमती कुऱ्हाडे यांनी केले आहे.











