आबलोली येथील अदिती साळवी हिची नवोदय विद्यालयसाठी निवड

आबलोली | वार्ताहर 

चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील कुमारी अदिती संदेश साळवी हिची राजापूर रत्नागिरी येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. अदिती साळवी हिची ग्रामीण भागातून निवड झाली आहे. हिचे वडील संदेश गजानन साळवी हे व्यावसायिक असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथे सुयश कॉम्प्युटर नावे संगणक प्रशिक्षण केंद्र चालवतआहेत. तर आई सावी संदेश साळवी या ही महा ई सेवा केंद्र चालक आहेत. अदितीचा भाऊ अनुज साळवी आणि बहीण रिद्धी साळवी हेही नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

गुहागर तालुक्यात एकूण 428 विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते त्यात अदिती संदेश साळवी हिला 93.75% उत्कृष्ट गुण प्राप्त केले अदितीला अमोल धुमाळ सर,तेजस केंबळे सर, सुशांत मुंडेकर तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. अदितीची नवोदय विद्यालय निवड झाल्याने सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनचा वर्षाव होत आहे.