श्रीराम मंदिर लांजा येथे गुरुवारी २६ मार्च रोजी भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा

या निमित्ताने लांजा शहरातून काढण्यात येणार श्रीराम लल्ला मूर्तीची भव्य रथयात्रा मिरवणूक

लांजा (प्रतिनिधी): लांजा शहरातील श्रीराम मंदिर येथे उद्या गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी प्रभू श्रीराम यांचा भव्य जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी श्रीराम मंदिर, बाजारपेठ लांजा येथे पारंपारिक पद्धतीने प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.‌ गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ७ ते ९ अभिषेक आणि पूजा अर्चन, दुपारी १२ ते १.०० श्रीराम जन्म कथा पोथी वाचन आणि श्रीराम जन्म सोहळा साजरा होणार आहे.‌ सायंकाळी ४ ते ६ यावेत राम रक्षा पठण करण्यात येणार असून सायंकाळी पाच ते सहा यावेळेत विश्व हिंदू परिषद महिला सत्संग कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९
या कालावधीत श्रीराम लल्ला मूर्तीची भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीराम मंदिर अशी काढण्यात येणार आहे.‌ रात्री नऊ वाजता महाआरसी आणि रात्री १० वाजता पडद्यावरील पौराणिक चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमात सर्व राम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन, श्रीराम सेवा समिती व रामभक्त यांच्यावतीने करण्यात आले आहे.