कणकवली : कणकवली तालुक्यातील मूळ गाव नाटळ (धाकटे मोहुळ) येथील व सध्या कणकनगर येथे वास्तव्यास असलेल्या अनघा लक्ष्मण सावंत (वय ६५) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या शांत व मनमिळावू स्वभावाच्या असल्याने परिसरात त्यांची जिव्हाळ्याच्या व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख होती. त्यांच्या निधनाने नाटळ तसेच कणकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती तुकाराम सावंत, मुलगा पंकज, मुलगी पल्लवी राणे, नातू-नातवंडे तसेच चुलत दीर, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक तुकाराम सावंत यांच्या त्या पत्नी होत, तर दैनिक ‘कोकणसाद’चे समीर सावंत यांच्या त्या काकी होत.












